Farmers Success Story : उच्चशिक्षित शेतकऱ्याने केली 350 झाडांची लागवड, दीड एकरात 6 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Farmers Success Story : एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने सहा वर्षांपूर्वी बाग लावली. आता अल्पभूधारक शेतकरी नवनाथ महादेव हराळे हे दीड एकरात 6 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गेल्या चार ते पाच वर्षापासून नवनाथ हराळे हे भगवा जातीच्या डाळिंबाची शेती करत आहे. दीड एकरात त्यांनी 420 डाळिंबांच्या रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना जवळपास 80 हजार ते 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आला आहे. दीड एकरातून त्यांना डाळिंबाचे पाच टनाचे उत्पन्न मिळाले आहे. तर सर्व खर्च वजा करून पाच ते सहा लाखाचा नफा राहिल्याचं हराळे यांनी सांगितलं.
advertisement
हराळे यांनी डाळिंब शेतीची योग्य ती माहिती घेऊन नियोजनबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली. आता त्यांनी नव्यानं दीड एकरात डाळिंगाची लागवड केलीये. पहिलं वर्ष असल्याने उत्पन्न कमी निघालं. परंतु, पुढील काळात आठ टनांपर्यंत उत्पन्न निघणार आहे. तेव्हा चांगली कमाई होईल, असं शेतकरी नवनाथ सांगतात.
advertisement