Aajache Rashibhavishya: आज पैशाचा पाऊस होणार, पण एक चूक भोवणार, वाचा 27 जूनचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आज 27 जून हा दिवस काही राशींना अत्यंत लाभदायी असणार आहे. तर काहींच्या आयुष्यात नवी आव्हाने निर्माण करणार आहे. तुमच्या राशीचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी - आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - जमिनी संदर्भातील व्यवहार आज सफल होतील. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आज यश प्राप्त होणार. आजचा तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. आज तुम्हाला काही तरी वाईट वार्ता मिळण्याचे संकेत आहे. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आज तुमच्या हाताने कुठलातरी नवीन कामाचा शुभारंभ होईल. आर्थिक प्रश्न आज तुमचे सुटणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
सिंह राशी - पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्व ही देऊ शकतात. आशा आकांक्षा सोडू नका आज तुमच्या हातातील कामे नक्की पूर्ण होतील. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
कन्या राशी - स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. आज अविवाहित मंडळींना साठी काही तरी आनंदाचा दिवस असणार आहे. तुमचा शुभ अंक आज 4 आणि रंग करडा आहे.
advertisement
तूळ राशी - अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या कामावर होणार. तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. कोणाचेही मन दुखणार नाही असे शब्द बोला. आज तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही अडचणीत येणार. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
धनु राशी - घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. आज तुमचा दिवस हा खर्चिक असणार आहे. ज्याने तुम्हाला पुढे आर्थिक गोष्टींची कमतरता भासणार आहे. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
मकर राशी - आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्या ही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आज तुमचा शुभ अंक 3 असून रंग पिवळा आहे.
advertisement
मीन राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 1 असून रंग हा नारंगी आहे.
advertisement