Astrology: परिस्थिती आणखी बिकट! मीन राशीत विष योग तयार झाल्यानं 3 राशींच्या जीवनात वादळ, बिग लॉस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या ठराविक स्थितीनुसार विविध शुभ-अशुभ योग तयार होतात. सध्या एक अशुभ विष योग तयार झाला आहे. या विषयोगामुळे मानसिक ताण-तणाव, दुर्दैवी गोष्टी आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते.
चंद्र आणि शनिची विशिष्ट युती होते किंवा जेव्हा या दोन्ही ग्रहांची एकमेकांवर दृष्टी असते तेव्हा असा योग तयार होतो. काल 12 ऑगस्ट रोजी चंद्र आणि शनि मीन राशीत युतीत आले असल्यानं 14 ऑगस्ट रोजी सकाळी 09:06 वाजेपर्यंत त्यांचा अशुभ प्रभाव दिसून येईल. जाणून घेऊ, हा विष योग कोणत्या राशींसाठी हानिकारक ठरू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या योगामुळे धोका निर्माण झाला आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात, अधिकाऱ्यांशी किंवा सहकाऱ्यांशी गैरसमज झाल्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. सावधगिरी बाळगा आणि कोणतेही काम विचारपूर्वक करा. प्रेमसंबंधात असलेल्यांना या काळात त्यांच्या नात्यात चढ-उतार पहावे लागू शकतात.
advertisement
धनु राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, धनु राशीच्या चौथ्या घरात विषयोग निर्माण झाला आहे. यामुळे कामाच्या ठिकाणीही तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. ऑफिसमध्ये शांत राहा, ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा. झोपेचा प्रॉब्लेम सतावू शकतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
advertisement
विष योगाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा किमान 108 वेळा भक्तीभावानं जप करा, गरजूंना दान करा. या काळात शांत राहा आणि राग टाळा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)