Budh Gochar 2025: सूर्याच्या घरात बुधाचा प्रवेश! या 8 राशींचे टेन्शनमध्ये जाणार 15 दिवस; घाट्यात येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mercury Transit August 2025: दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4:48 वाजता ग्रहांचा राजकुमार मानला जाणार बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. ग्रहांचा राजा सूर्याच्या म्हणजेच सिंह राशीच्या घरात बुध ग्रह भ्रमण करेल, याचा परिणाम 8 राशीच्या लोकांच्या जीवनावर निश्चितच होणार आहे. 30 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर सकाळी 11:10 वाजेपर्यंत या राशींना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. सिंह राशीतील बुध संक्रमणाच्या नकारात्मक परिणामांबद्दल जाणून घेऊया.
मेष: सिंह राशीतील बुध संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांच्या अडचणी वाढतील. समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. या काळात कोणत्याही मोठ्या कामाचं नियोजन करणे किंवा काम सुरू करणे टाळावे, आपल्यासाठी परिणाम अनुकूल नसतील. तुम्ही सावधगिरीने आणि विवेकाने काम केले तर परिणाम वाईट असण्याची शक्यता नाही.
advertisement
वृषभ: सिंह राशीतील बुधाचे संक्रमण वृषभ राशीसाठी अडचणीचे ठरू शकते. व्यवसायात अडचणी येतील, कामातील बदल नोकरीत त्रासदायक वाटेल. त्यामुळे घरातही ताण-तणावाचे वातावरण असेल. आईच्या आरोग्याच्या समस्यांमुळे आर्थिक अडचणी निर्माण होतील. समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात, परंतु त्यावर उपाय शक्य आहेत. कोणतेही मोठे काम सुरू करणे टाळावे, परिणाम अनुकूल नसतील.
advertisement
कर्क: सिंह राशीतील बुधाचे संक्रमण कर्क राशीसाठी व्यावसायिक आघाडीवर मारक ठरेल. परस्पर माहितीच्या अभावामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये बदल करावे लागतील. सिंह राशीतील बुधाच्या वक्री स्थितीमुळे व्यावसायिक आघाडीवर आर्थिक अडचणी येतील. कडवट बोलण्यामुळं कुटुंबाशीही मतभेद होऊ शकतात. बुधाची उपस्थिती आर्थिक आणि कौटुंबिक बाबींसाठी फायदेशीर ठरू शकते.
advertisement
कन्या: सिंह राशीतील बुधाचे संक्रमण कन्या राशीसाठी व्यवसायात घाटा आणेल. घरगुती संबंध चांगले असणार नाहीत, आर्थिक परिस्थिती अस्थिर राहील. सिंह राशीतील बुधामुळे आरोग्याच्या अडचणी निर्माण होतील, वाद न घालता चर्चेने विषय सोडवा, नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करू शकता. सिंह राशीतील बुधाच्या संक्रमणादरम्यान तुम्हाला काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. अनावश्यक खर्च टाळा.
advertisement
वृश्चिक: सिंह राशीतील बुध संक्रमण वृश्चिक राशीच्या व्यावसायिक जीवनात अडचणी आणेल, कामात असंख्य विघ्ने येण्याची शक्यता आहे. अहंकारामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये अनेक संवाद समस्या निर्माण होतील. सिंह राशीतील वक्री बुधामुळे कामाच्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या चुकांमुळे तुमच्या व्यावसायिक समस्या वाढतील; वैयक्तिक संबंधांमध्ये गैरसमज वाढतील.
advertisement
advertisement
advertisement
मीन: सिंह राशीतील बुध संक्रमण मीन राशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात अडचणी वाढवे. नफा मिळवण्यासाठी कसरत करावी लागेल. सिंह राशीतील बुध प्रवेशाने घरगुती आघाडीवर मतभेदाची भावना वाढेल. व्यावसायिक जीवनात तुम्हाला इतरांकडून विश्वासघाताच्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)