Vakri Horoscope: किती काळ दुसऱ्यांची भर केली! या राशींचा आता भाग्योदय, शनि-बुधाची वक्री चाल लकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vakri Horoscope 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी पालट करतो, त्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांवर दिसून येतो. ग्रहांमधील शनी सध्या मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. १३ जुलै रोजी शनि मीन राशीत वक्री झाला, तर १८ जुलै रोजी बुध देखील कर्क राशीत वक्री झाला.
advertisement
advertisement
मेष राशी - या राशीच्या बाराव्या घरात शनि वक्री आणि चौथ्या घरात बुध आहे. या राशीत शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. परंतु शनि वक्री असल्याने त्याचे दुष्परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या अनेक समस्या संपू शकतात. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. जीवनात आनंद पुन्हा परतू शकतो. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्ही अडचणी दूर करू शकता. अनावश्यक खर्च आता होणार नाहीत. तुम्हाला परदेशाशी संबंधित बाबींमध्येही यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे.
advertisement
तूळ - या राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुधाची वक्री चाल अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम देऊ शकते. बुध या राशीच्या दहाव्या घरात आणि शनि सहाव्या घरात वक्री आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये अपार यश मिळू शकते. कुटुंबात सुरू असलेला कलह संपुष्टात येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला असू शकतो. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता जास्त आहे. तुम्ही विरोधकांवर किंवा स्पर्धकांवर वर्चस्व गाजवाल. तुमचा कामातील आत्मविश्वासही वाढेल. व्यवसायात तुम्ही बनवलेली रणनीती किंवा योजना फायदेशीर ठरू शकते. समाजात आदर वाढू शकतो.
advertisement
कुंभ - या राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध वक्री असणे फलदायी ठरू शकते. या राशीच्या दुसऱ्या घरात शनि आणि सहाव्या घरात बुध वक्री आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. परंतु खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)