Astrology: सुख-संपत्तीचा कारक ऑगस्टमध्ये या राशींना पावणार; अख्या कुटुंबाचं नाव रोशन करण्याचा योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Gochar 2025: सुख-संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह हा एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो, ज्याचा परिणाम साहजिकच संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. प्रेम-आकर्षण, संपत्ती, आनंद आणि समृद्धीचा कारक असलेला शुक्र ऑगस्ट महिन्यात चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे त्याची बुधाशी युती होऊन लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.
advertisement
advertisement
मेष राशी - या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप लकी ठरू शकतो. या राशीच्या चौथ्या घरात शुक्र-बुध ग्रहाची युती होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कामातील प्रगती पाहता, तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
advertisement
मेष राशीच्या लोकांना यासोबतच पगारवाढीची शक्यता आहे. तुमची कोणतीही दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली इच्छा पूर्ण होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग हाती लागतील. तुम्हाला जमीन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. तुमचे उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहू शकतात. भावंडांसोबत चांगला काळ जाणार आहे.
advertisement
मिथुन राशी - या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. या राशीच्या दुसऱ्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्यामुळं या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसणार आहेत. तुम्ही नवीन कपडे, दागिने इत्यादी खरेदी करू शकता. अध्यात्माकडे कल वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही घरी कोणत्याही शुभकार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला सरकारी आणि प्रशासकीय कामात प्रचंड यश मिळू शकते. आयुष्यात आनंद पुन्हा येऊ शकतो. मोठ्या प्रवासाला जाण्याची संधी देखील मिळू शकते.
advertisement
वृश्चिक राशी - या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अतिशय लकी ठरू शकतो. या राशीच्या भाग्य घरात शुक्र-बुध ग्रहाची युती जुळून येत आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहू शकतात. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. यासोबतच कुटुंबातील दुरावा कमी होऊ शकतो. तुम्हाला परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये प्रचंड यश मिळू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)