Kia: एक बटन दाबलं की SUV आपोआप होईल पार्क, 'ती' नव्या रुपात परत येतेय!
- Published by:sachin Salve
Last Updated:
रुबाबदार डिझाईनमुळे याा एसुव्हीची तुफान विक्री झाली. पण आता या सेल्टोस एसयुव्हीचं लवकरच नवीन अपग्रेड मॉडेल लाँच होणार आहे.
हुंदई मोटर्सच्या नंतर दक्षिण कोरियाची किआ मोटर्स भारतात आली आणि बघता बघता या कंपनीने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. किआने २०१९ मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली सेल्टोस भारतात आणताच हिट झाली. रुबाबदार डिझाईनमुळे याा एसुव्हीची तुफान विक्री झाली. पण आता या सेल्टोस एसयुव्हीचं लवकरच नवीन अपग्रेड मॉडेल लाँच होणार आहे. ही एसयुव्ही नवीन सेगमेंट-फर्स्ट फीचरसह येण्याची अपेक्षा आहे.
advertisement
अलीकडेच नव्या किआ सेल्टोसचे नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोमधून एसयूव्हीची काही प्रमुख वैशिष्ट्यं उघड झाली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या कारमध्ये नवीन पार्किंग सेन्सर्स दिले आहे. सध्या, सेल्टोसमध्ये ४ फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आहेत. नवीन सेल्टोसमध्ये ६ फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स दाखवण्यात आले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement