Prarthana Behere: ‘माझं पहिलं मूल लग्नाआधीचं...’ अखेर प्रार्थना बेहेरेनं सोडलं मौन, खरं काय ते सांगूनच टाकलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prarthana Behere: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मुळे चर्चेत आहे. या दरम्यान तिने मूल नाही यावर मौन सोडलं आहे.
advertisement
advertisement
यावर हसून प्रार्थनाने सांगितलं की, "हो, हे खरं आहे! यातला माझा एक मुलगा तर लग्नाआधीचा होता. ज्याचं नाव 'गब्बर' आहे." पण गब्बर हा तिचा मुलगा नसून तिचा लाडका कुत्रा आहे. प्रार्थनाला प्राण्यांवर खूप प्रेम आहे. तिच्याकडे 7 कुत्रे आहेत आणि तिच्या फार्महाऊसवर अजून अनेक प्राणी आहेत. तिथे गायी आणि 10-12 घोडे आहेत.
advertisement
प्रार्थना सांगते की, "हे सगळेच आमची मुलं आहेत. त्यांची काळजी घेणं सोपं नसतं, पण त्यांचं प्रेम खूप मोलाचं आहे. आम्ही आता ठरवलंय की, मानव मुलं नको, हीच आमची मुलं. प्रार्थनाचे पती अभिषेक जावकर यांनाही प्राण्यांवर खूप प्रेम आहे. प्रार्थना म्हणाली, "अभिषेक प्राण्यांसाठी खूप पझेसिव्ह आहे. लहानपणापासूनच त्याला प्राण्यांची आवड आहे."
advertisement
advertisement
advertisement