OTT Movie: 1 तास 45 मिनिटांचा सर्व्हायव्हल थ्रिलर, एक ट्विस्ट अन् पूर्ण कहाणीच बदलते

Last Updated:
OTT Movie: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुरुवातीला प्रेक्षकांच्या नजरेतून सुटले, परंतु नंतर त्यांनी क्लासिकचा दर्जा मिळवला. अशाच चित्रपटाविषयी जाणून घेऊया.
1/7
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुरुवातीला प्रेक्षकांच्या नजरेतून सुटले, परंतु नंतर त्यांनी क्लासिकचा दर्जा मिळवला. अशाच चित्रपटाविषयी जाणून घेऊया. जो थिएटरमध्ये तर कमाल करु शकला नाही मात्र नंतर ओटीटीवर येऊन धुमाकूळ घातला.

advertisement
2/7
2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा सर्व्हायव्हल थ्रिलर सिनेमा आहे. थिएटरमध्ये फारसा चालला नाही, पण आज ओटीटीवर लोक त्याला पुन्हा शोधून पाहत आहेत. आपण बोलत असलेला हा सिनेमा आहे, राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड'.

3/7
“ट्रॅप्ड” मध्ये राजकुमार रावने साकारलेला शौर्य हा सामान्य तरुण आहे, जो कॉल सेंटरमध्ये काम करतो. त्याचं आयुष्य साधं आहे, पण एक निर्णय त्याचं सगळं बदलून टाकतो.

4/7
प्रेमात असलेला शौर्य त्याची प्रेयसी नूरीशी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतो. यासाठी तो तातडीने एक स्वस्त फ्लॅट शोधतो —
प्रेमात असलेला शौर्य त्याची प्रेयसी नूरीशी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतो. यासाठी तो तातडीने एक स्वस्त फ्लॅट शोधतो — "स्वर्ग" नावाच्या बिल्डिंगमध्ये. पण तेच “स्वर्ग” त्याच्यासाठी नरकात बदलतं.
advertisement
5/7
फ्लॅट पाहण्यासाठी एकट्याने गेलेला शौर्य चुकून आत अडकतो. वीज नाही, फोन बंद, खिडक्या बंद आणि बाहेर मदतीसाठी कुणी नाही. दिवस जातात, आणि त्याचं जगणं एका थरारक संघर्षात रूपांतरित होतं. तो पाण्यासाठी पावसाची वाट पाहतो, कबुतरं आणि मुंग्या खाऊन जगण्याचा प्रयत्न करतो, आणि एका उंदराशी मैत्री करतो.

6/7
हा चित्रपट केवळ सर्व्हायव्हल थ्रिलर नाही तर तो एक मानसिक प्रवास आहे. एकटेपणा, भीती, आणि जगण्याची झुंज यांचं वास्तव चित्रण यात दिसतं. राजकुमार रावचा अभिनय इतका जबरदस्त आहे की प्रेक्षक शौर्यच्या वेदना आणि घुसमटीला अनुभवतात.

7/7
विक्रमादित्य मोटवणे दिग्दर्शित “ट्रॅप्ड” चे संपूर्ण चित्रीकरण एका फ्लॅटमध्ये झाले आहे आणि तरीही, तो तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट ZEE5 वर पाहता येतो, आणि एकदा पाहिला की विसरणं अशक्य आहे.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement