कपूर घराण्याचा वारस, ज्याच्या मृत्यूसाठी आईनेच रचला सापळा, मग कसा बनला सुपरस्टार?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
या अभिनेत्याचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी झाला. पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे पुत्र होते. मात्र, त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांची जन्मदाती आईच त्यांच्या मृत्यूसाठी प्रयत्न करत होती.
advertisement
advertisement
त्याकाळी अबॉर्शनची सोय फारशी नव्हती तरी रामसरणी यांनी अनेक प्रयत्न केले. सायकलवरून पडणे, जिन्यावरून पाय घसरवणे, अगदी दोरी-उड्या करणे असे अनेक धोकेदार प्रयत्न त्यांनी केले. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. १८ मार्च १९३८ रोजी शशि कपूर यांचा जन्म झाला. स्वयं शशि कपूर यांनी १९९५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ही धक्कादायक गोष्ट उघड केली होती.
advertisement
शशि कपूर यांच्या प्रेमकहाणीतही एक वेगळाच ट्विस्ट आहे. त्यांनी जेनिफर केंडल या ब्रिटीश अभिनेत्रीशी लग्न केले. जेनिफर वयाने शशिजींपेक्षा पाच वर्षांनी मोठ्या होत्या. पण प्रेमापुढे वयाचे हे बंधनही तुटले. विशेष म्हणजे सुरुवातीला काही गैरसमजुतींमुळे जेनिफर यांना शशि कपूर समलिंगी असल्याचा संशय आला होता!
advertisement
शशि कपूर यांना लहानपणापासूनच रंगभूमीची ओढ होती. पृथ्वी थिएटरमध्ये ते फक्त ५० रुपये मासिक वेतन घेऊन काम करायचे. त्याच सुमारास त्यांना 'शेक्सपिएराना' या नाट्य कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. या कंपनीचे प्रमुख जेनिफर यांचे वडील होते. शशि कपूर खूपच लाजरे होते, त्यामुळे सुरुवातीला त्यांनी जेनिफरशी फारसं बोलणंही केलं नाही. याचमुळे जेनिफर यांना शशि समलिंगी असल्याचा गैरसमज झाला होता.
advertisement
advertisement