7 दिवसात 800 कोटींची कमाई, Horror Movie ने रिलीज होताच घातला धुमाकूळ, Box Office दणाणलं!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Horror Movie : हा हॉरर चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित झाला आणि आठवड्याभरातच गाजला. आतापर्यंत ९३ मिलियन डॉलर्स, म्हणजेच जवळपास ७९४ कोटी रुपये कमावले.
मुंबई : काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर थेट कब्जा करतात, आणि तसंच काहीसं नुकतंच ‘Sinners’ या हॉरर चित्रपटाने करून दाखवलंय. १८ एप्रिलला प्रदर्शित झालेला हा सिनेमा फक्त आठवड्याभरात जगभरात गाजू लागलाय. भारतात 'केसरी चॅप्टर २' आणि 'जाट की आंधी' अशा मोठ्या चित्रपटांच्या गदारोळातही 'Sinners' आपला ठसा उमटवतोय.
advertisement
रयान कूगलरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘Sinners’ ने अमेरिकन बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 'बॉक्स ऑफिस मोजो'च्या माहितीनुसार, युएस मार्केटमध्ये या चित्रपटाने तब्बल ७७.५२ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ६६२ कोटी रुपये कमावले आहेत. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही 'Sinners' चं कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय, जिथे याने जवळपास १५.५ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३२ कोटी रुपये जमा केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
‘Sinners’ आपल्याला १९३२ च्या मिसिसिपी डेल्टा या पार्श्वभूमीवर घेऊन जाते. इथे दोन जुळी भावंडं - स्मोक आणि स्टॅक आपलं गाव सोडून परत नव्या आयुष्याला सुरुवात करायला येतात. पण त्यांच्या आयुष्यात अचानक एका पिशाचाचं आगमन होतं, ज्यामुळे त्यांचं स्वप्न एका भीषण दुःस्वप्नात बदलतं. ‘Sinners’ या चित्रपटाची मुळातली हॉरर आणि इमोशनल थरार यांची सांगड प्रेक्षकांना फारच भावते आहे. त्यामुळेच फक्त हॉरर प्रेमींनीच नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.