फ्लॉवर साफ करायला झंझट वाटते? टेन्शन नॉट 'या' ट्रिकने 5 मिनिटत साफ होईल भाजी

Last Updated:
विशेषत: हिवाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे फ्लॉवर (फुलकोबी). दिसायला ताजी, पांढरी आणि आकर्षक असली तरी ती नीट न धुतल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
1/6
घरातील स्वयंपाकघर म्हणजे महिलांचं साम्राज्य असतं. रोजच्या जेवणात काय बनवायचं, कोणती भाजी ताजी आहे, कोणती पौष्टिक याची जबाबदारी बहुतांश वेळा महिलाच सांभाळतात. पण अनेक वेळा स्वयंपाक करताना एक छोटासा दुर्लक्षाचा भाग आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. विशेषत: हिवाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे फ्लॉवर (फुलकोबी). दिसायला ताजी, पांढरी आणि आकर्षक असली तरी ती नीट न धुतल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

advertisement
2/6
फ्लॉवरच्या फुलांमध्ये आणि त्याच्या छोट्या पोकळ्यांमध्ये सूक्ष्म कीटक आणि जंतू लपलेले असतात. हे डोळ्यांना दिसत नाहीत, पण शरीरात गेल्यावर पोटदुखी, विषबाधा, उलटी-दस्त, आणि इन्फेक्शन निर्माण करू शकतात. त्यामुळे फ्लॉवर शिजवण्याआधी ते योग्य प्रकारे स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे.

3/6
खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवाताजं फ्लॉवर नेहमी पांढरं किंवा फिकट क्रीम रंगाचं असतं. पिवळं किंवा तपकिरी दिसत असेल तर ते जुने आहे.
पानं हलक्या हिरव्या आणि फ्रेश असावीत. सुकलेली पानं असलेलं फ्लॉवर टाळा. त्यातून दुर्गंधी येत असेल तर ती भाजी खराब आहे. ताजेपणाचा हलका सुगंध असलेलं फ्लॉवर निवडा.
खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवाताजं फ्लॉवर नेहमी पांढरं किंवा फिकट क्रीम रंगाचं असतं. पिवळं किंवा तपकिरी दिसत असेल तर ते जुने आहे.पानं हलक्या हिरव्या आणि फ्रेश असावीत. सुकलेली पानं असलेलं फ्लॉवर टाळा. त्यातून दुर्गंधी येत असेल तर ती भाजी खराब आहे. ताजेपणाचा हलका सुगंध असलेलं फ्लॉवर निवडा.
advertisement
4/6
घरगुती पद्धतीने फ्लॉवर कसं धुवावं?-फ्लॉवरचे छोटे तुकडे करा.
-एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या.
-त्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाका.
-फ्लॉवरचे तुकडे त्यात 15-20 मिनिटं भिजवा.
-काही वेळातच पाण्यावर लहान कीटक तरंगताना दिसतील.
-शेवटी फ्लॉवर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
घरगुती पद्धतीने फ्लॉवर कसं धुवावं?-फ्लॉवरचे छोटे तुकडे करा.-एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या.-त्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाका.-फ्लॉवरचे तुकडे त्यात 15-20 मिनिटं भिजवा.-काही वेळातच पाण्यावर लहान कीटक तरंगताना दिसतील.-शेवटी फ्लॉवर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
advertisement
5/6
हा उपाय का फायदेशीर आहे?हळद आणि मीठ हे दोन्ही नैसर्गिक किटकनाशक आणि अँटीबॅक्टेरियल घटक आहेत. त्यामुळे फ्लॉवरमधील जंतू आणि कीटक सहजपणे नष्ट होतात आणि ते आरोग्यास सुरक्षित बनतं.
हा उपाय का फायदेशीर आहे?हळद आणि मीठ हे दोन्ही नैसर्गिक किटकनाशक आणि अँटीबॅक्टेरियल घटक आहेत. त्यामुळे फ्लॉवरमधील जंतू आणि कीटक सहजपणे नष्ट होतात आणि ते आरोग्यास सुरक्षित बनतं.
advertisement
6/6
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फ्लॉवरची भाजी बनवाल, तेव्हा हा सोपा पण प्रभावी उपाय नक्की करून पाहा. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ही छोटी काळजी खूप मोठा फरक करू शकते.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फ्लॉवरची भाजी बनवाल, तेव्हा हा सोपा पण प्रभावी उपाय नक्की करून पाहा. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ही छोटी काळजी खूप मोठा फरक करू शकते.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement