Delhi Car Blast : दिल्ली कार स्फोटात बॉलिवूड अभिनेत्रीनं गमावली अत्यंत जवळची व्यक्ती, म्हणाली, 'एक आठवड्याआधीच...'

Last Updated:

Delhi car Blast : दिल्ली लाल किल्ल्याजवळ कार बॉम्ब स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं तिची अत्यंत जवळची व्यक्ती गमावली.

News18
News18
सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाने देश हादरला. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. या स्फोटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं तिची अत्यंत जवळची व्यक्ती गमावली. या घटनेचा अभिनेत्री शॉक बसला असून प्रतिक्रिया देत तिला अश्रू अनावर झाले.
प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोषची मैत्रीण दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटा मृत्यूमुखी पडली. सुनीता मिश्रा असं तिच्या मैत्रिणीचं नाव होतं. सुनीता आणि पायल या दोघी शाळेपासून एकत्र होत्या. या बॉम्बस्फोटात अभिनेत्री पायलनं तिची शाळेची जिवलग मैत्रीण गमावली. मैत्रिणीच्या मृत्यूने पायलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दिल्लीतील स्फोटात तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूने पायल घोषला धक्का बसला आहे. घटनेच्या फक्त एक आठवडा आधी पायल सुनीताशी बोलली होती. तिच्यासोबत झालेलं शेवटचं बोलणं आठवताना पायलला अश्रू अनावर झाले. बॉलीवूड बबलशी बोलताना पायल म्हणाली,  "मला अजूनही विश्वास बसत नाही की ती गेली आहे. आम्ही एक आठवड्यापूर्वी बोललो होतो. ती जिवंत होती, नेहमी हसत होती, नेहमी सकारात्मकता पसरवत होती. मला विश्वास बसत नाही की अशी दयाळू व्यक्ती अशा क्रूरतेचा बळी ठरली."
advertisement
सुनीतासोबतच्या तिच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत पायल म्हणाली, "ती फक्त एक मैत्रीण नव्हती ती एक कुटुंब होती. आम्ही एकत्र वाढलो, स्वप्ने पाहिली, हसलो आणि संघर्ष केला. तिला ज्या पद्धतीने गमावलं आहे त्याचं दु:ख शब्दांत सांगता येणार नाही." या कठीण काळात पीडितांच्या कुटुंबांना पाठिंबा देण्याचे आणि त्यांच्यासोबत उभे राहण्याचे आवाहन तिने जनतेलाही केले.
advertisement

पीडितांना दिल्ली सरकारची मदत

या घटनेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांना 10 लाख, तर अपंगत्व किंवा गंभीर जखमींना 5 लाखांची मदत करण्यात आली आहे. सीएम गुप्ता म्हणाल्या "या कठीण काळात दिल्ली सरकार प्रियजनांना गमावलेल्या आणि या घटनेत जखमी झालेल्या सर्व कुटुंबांना मनापासून संवेदना व्यक्त करते."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Delhi Car Blast : दिल्ली कार स्फोटात बॉलिवूड अभिनेत्रीनं गमावली अत्यंत जवळची व्यक्ती, म्हणाली, 'एक आठवड्याआधीच...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement