पावसात पाणीपुरी खायची हौस पाडू शकते आजारी! खायचीच असेल तर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका प्रचंड असतो. काही आजारांची लागण पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणावर होते. टायफॉइडही त्यापैकीच एक. हा आजार होऊ नये यासाठी नेमकं काय करावं, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
डॉ. वीके पांडे सांगतात, केवळ खराब पाणी प्यायल्यानंच आजार होतात असं नाही, तर अनेकदा लोक कुठूनही येतात आणि जेवायला बसतात. हेसुद्धा आजारपणाचं कारण ठरू शकतं.
advertisement
हातातली घाण पोटात जाऊ शकते. पोटात घाण जाणं हे टायफॉइड होण्याचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे घरचंच जेवण जेवावं आणि जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवावे.
advertisement
जंक फूड आरोग्यासाठी घातक असतंच, मात्र पावसाळ्यात तर हे पदार्थ कटाक्षानं टाळावे. कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. परिणामी विविध आजार जडू शकतात.