सूर्यनमस्कार कुणी करू नये? काय घ्यावी काळजी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सूर्यनमस्कार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, हे करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं.
advertisement
advertisement
सूर्यनमस्कार हा अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीर बळकट होते. शरीराची लवचिकता वाढते. बॉडीची स्ट्रेंथ वाढते. स्टॅमिना वाढतो. मानसिक स्तरावर विचार केल्यास सूर्यनमस्कार केल्याने मानसिक संतुलन ठीक राहण्यासाठी अतिशय फायदा होतो.
advertisement
advertisement
सूर्यनमस्कार हे वयाच्या बारा वर्षांपासून ते त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही. वयाच्या बारा वर्षापासून पुढे शारीरिक क्षमता असेपर्यंत तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. सूर्यनमस्कार हा खूप आजारी व्यक्ती ज्यांना खूप विकनेस आलेला आहे अशा व्यक्तीने करू नये. त्याचबरोबर गर्भवती महिला यांनी सूर्यनमस्कार करू नये. बारा वर्षाखालील लहान मुलांनी देखील सूर्यनमस्कार करू नये, असे गीता कोल्हे यांनी सांगितलं.
advertisement
प्राचीन काळापासून भारतात सूर्यनमस्कार करण्याची प्रथा आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी, योगी पुरुष हे सूर्यनमस्काराला प्राधान्य द्यायचे. सूर्यनमस्कार हा जगाच्या पाठीवर सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. भारतातील वातावरणाशी सुसंगत असा हा व्यायाम प्रकार असल्याने भारतातील लोकांनी सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारालाच प्राधान्य दिले पाहिजे.
advertisement