Healthy Fruit : डायबिटीज, मूळव्याधीवर रामबाण औषधं आहे हे फळ, फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
निरोगी राहण्यासाठी चांगला आणि सकस आहार विषयक असतो. या आहारात फळांनाही खूप महत्व आहे. काही फळं आपल्याला वाटतात त्यापेक्षा खूप फायदे देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका फळाविषयी सांगणार आहोत, जे बाहेरून कडक असले तरी त्यामध्ये औषधांचे भांडार आहे. रक्तातील साखर आणि मूळव्याधावर हे रामबाण औषध आहे. हे फळ नियमित खाल्यास आपल्या प्रत्येक अवयव उर्जेने भरतो. चला प[पाहूया ते फळ कोणतं आहे आणि त्याचे फायदे काय.
बेल म्हणजेच Bael फळ हे उन्हाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि कौमरिन नावाची रसायने असतात. ही रसायने शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने दमा, लूज मोशन यासह अनेक आजारांवर उपचार करता येतात. याशिवाय बेलमध्ये असलेले काही संयुगे उच्च रक्तातील साखर आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. चला पाहूया याचे आणखी काही फायदे.
advertisement
रक्तातील साखर नियंत्रित करते : WebMD च्या अहवालानुसार, Bael रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. वास्तविक, हे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचा प्रवाह नियंत्रित करून मधुमेह रोखण्यास मदत करते. साखरेमुळे होणाऱ्या जीवघेण्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी देखील ते प्रभावी ठरू शकते. मात्र बेलचे सेवन करताना, डायबिटीजसाठी औषध देखील घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement