Gold Rate: वटपौर्णिमेआधी महाग झालं सोनं, नाशिक सराफा बाजारातून मोठं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: सोन्याच्या चांदीच्या दरांत गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. नाशिक सराफा बाजारात आज पाचव्या दिवशी सोनं महागलं आहे.
सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढउतार होत आहेत. सध्याच्या आठवड्यात सोन्याला झळाळी आली असून लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या चांदीच्या दरांत मोठी वाढ झालीये. त्यामुळे ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
advertisement
नाशिक सराफा बाजारात सोमवारपासून सोन्याच्या दरांत मोठी वाढ झालीये. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर पुन्हा 100 रुपयांनी महागले. त्यामुळे आठवडाभरात तब्बल 3700 रुपयांनी सोनं वधारलं आहे.
advertisement
गुरुवारी 600 तर आज 100 रुपयांची वाढ झाल्याने आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 97 हजार 600 रुपयांवर गेले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या मोडीसाठी 94 हजार 672 रुपये मिळणार आहेत. 22 कॅरेट दागिन्यांसाठी प्रतितोळा 89 हजार 402 रुपये मोजावे लागतील.
advertisement
सोन्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून चांदी देखील वधारेलली आहे. आज एक किलो चांदी ही 1 लाख 6 हजार 300 रुपयाला मिळणर आहे.
advertisement