Gold Rate: सराफा बाजारात मोठी घडामोड, सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, पाहा तोळ्याचा दर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढउतार होत आहेत. आज सोनं स्वस्त झालं असून चांदी 1100 रुपयांनी महागलीये.
गेल्या काही काळात लाखाच्या घरात गेलेलं सोनं पुन्हा घसरलं होतं. सराफा बाजारात सातत्याने चढउतार होत आहेत. आता पुन्हा एकदा सराफा बाजारातून मोठं अपडेट आहे. चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालंय.
advertisement
नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या दरांत तब्बल 1300 रुपयांची घट झालीये. त्यामुळे ऐन लग्नसराईत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच सोन्यात गुंतवणूक करणारांसाठी देखील सुवर्णसंधी मानली जातेय.
advertisement
बुधवारी नाशिक सराफा बाजारात सोन्याचे दर 200 रुपयांनी घटले होते. आज गुरुवारी देखील त्यात 1300 रुपयांची घट झालीये. त्यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 2 दिवसांत 1500 रुपयांनी घसरले आहेत.
advertisement
सराफा बाजारात आज 24 कॅरेज 10 ग्रॅम सोनं 94 हजार 900 रुपयांवर आहे. तर तेवढ्याच मोडीसाठी 92 हजार 53 रुपये मिळतील. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी 86 हजार 928 रुपये मोजावे लागतील.
advertisement