लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळलं? कुठे आणि कसं पाहायचं? लगेच तपासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेत घोटाळे उघडकीस आले आहेत. 14 हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे. 65 वर्षांवरील महिला आणि सरकारी कर्मचारी महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. स्क्रुटिनी पुन्हा सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेतील घोटाळे मागच्या काही दिवसांमध्ये एकामागे एक घोटाळे समोर आले आहेत. 14 हजार पुरुषांनी लाडकी बहीणच्या नावे पैसे घेतले आहेत. 65 वर्षांवरील महिला, सरकारी कर्मचारी महिला यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची स्क्रुटिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
advertisement
लाडकी बहीण योजनेत नियमांना कचऱ्याची टोपली दाखवून ज्यांनी लाभ घेतला अशा महिलांची नाव यादीतून वगळण्यात आली आहे. ज्या महिलांना लाभ मिळणार त्यांची यादी वेबसाइटवर आहे. नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिलांना शोधण्यासाठी आयकर विभागाकडून डॉक्युमेंट मागवण्यात आले आहेत. त्याच आधारावर स्क्रुटीनी सुरू आहे.
advertisement
ज्या महिला प्रामाणिकपणे सगळे नियम पाळत आहेत काही कारणांमुळे त्यांचही नाव यातून वगळण्यात आलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासून पाहा. जर नाव नसेल तर तुम्ही वॉर्ड ऑफिस, ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन रितसर तक्रार देऊ शकता.
advertisement
यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. तिथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करायचं आहे. तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर अपलोड करुन योजनेची लिस्ट तुम्ही पाहू शकता.
advertisement
वेबसाइटवर लाभार्थी यादी किंवा 'अर्ज स्थिती' सारखा पर्याय शोधा. यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक, नाव, किंवा इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. आवश्यक माहिती भरल्यानंतर, शोध किंवा सबमिट बटणावर क्लिक करा.
advertisement
जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, जर नसेल तर समजून जा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांची नावं वगळण्यात आली आहेत त्या महिला तक्रार करू शकतात. तुमच्या कागदपत्राची छाननी आणि तक्रारीची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
advertisement