Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ट्रायलचा मुहूर्त ठरला! कधी सुरू होणार? पाहा PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. अहमदाबाद-मुंबई मार्गावर १२ स्टेशन्स असतील. २०२६ मध्ये जपानमधून डबे येतील आणि २०२९ पर्यंत सेवा सुरू होईल.
advertisement
advertisement
अहमदाबाद ते मुंबई ३०० किमी लांबाच्या या मार्गामध्ये २५७.४ किलोमीटरचं बांधकाम 'फुल स्पॅन लॉन्चिंग' या खास तंत्रज्ञानानं केलं गेलं आहे. यामुळे कामाला प्रचंड वेग मिळाला. नुसता मार्ग नाही, तर या दरम्यान अनेक मोठे नदीचे पूल, स्टील आणि पीएससी ब्रिज (काँक्रीटचे पूल) आणि रेल्वे स्टेशन्सची इमारतंही उभ्या राहिल्या आहेत. आतापर्यंत या प्रकल्पात ३८३ किलोमीटर खांब (पिलर्स), ४०१ किलोमीटर पाया (फाउंडेशन) आणि ३२६ किलोमीटर गर्डरचं काम पूर्ण झालंय. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण १२ स्टेशन्स असणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement