Weather Forecast : सूर्य आग ओकणार, राज्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह कोकणातील काही भागांत सूर्य आग ओकणार असून, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हवामान विभागाने विदर्भात 9 आणि 10 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे तसेच लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेपासून बचावासाठी हलके कपडे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.








