Sharad Mohol murder : चेहऱ्यावर समाधान अन् निवांतपणा, पोलीस कोठडीत बसलेल्या शरद मोहोळच्या मारेकऱ्यांचे PHOTOS समोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवत मारेकऱ्यांना अटक केली. पोलीस कोठडीत असताना आरोपींचे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये आरोपींचे चेहर दिसत आहे. (वैभव सोनवणे, प्रतिनिधी)
पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी शरद मोहोळवर त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवत मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपींचे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये आरोपींचे चेहर दिसत आहे.
advertisement
advertisement
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement