3 राशींचा सुवर्ण काळ सुरू झालाय...गुरूच्या कृपेनं हा महिना सुखात सरणार, काळजी नको!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
नवा महिना उजाडला की, तो आपल्यासाठी कसा असणार याचं गणित आपण मनोमनी मांडतो. ज्योतिषशास्त्र सांगतं की, एखादा दिवस किंवा महिना आपल्यासाठी कसा असेल हे आपल्या कुंडलीतील ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीवरून ठरत असतं. जर एखाद्या ग्रहाची कृपा आपल्यावर झाली तर आपला सुवर्ण काळ सुरू झाला म्हणून समजायचं, मग तो महिनाच काय अख्खं वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं ठरू शकतं. आता मे महिना कोणत्या राशींसाठी सुवर्ण संधी घेऊन आलाय, जाणून घेऊया. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू हा अत्यंत पवित्र ग्रह मानला जातो, म्हणूनच त्याच्या राशीप्रवेशाला विशेष महत्त्व असतं. आता तब्बल 12 वर्षांनी एक अद्भुत संयोग जुळून आलाय. 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणाऱ्या गुरू ग्रहाच्या कृपेने 3 राशींच्या व्यक्तींचं भाग्य अक्षरशः उजळून निघणार आहे. महिनाभर त्यांना कसलीच कमी नाही भासणार, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
advertisement
कर्क : आपल्यालासुद्धा गुरूच्या राशीप्रवेशामुळे खूप फायदा होईल. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थितीही भक्कम होईल. उत्पन्न जास्त आणि खर्च कमी अशी परिस्थिती असल्यामुळे मन प्रसन्न राहील.
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.