भारतात इथे 2 लाख रुपये किलो मिळतं तूप; ते खाण्यास मनाई, तरी परदेशातून मोठी मागणी, पण का?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तुमच्या घरातील तुपाची किंमत काय असेल? 500...1000 रुपये आणि त्याचे फायदे किंवा तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त, याची तुम्हाला कल्पना नसेल. मात्र, गुजरातमध्ये विकलं जात असलेल्या एका तुपाचे फायदे जाणून तुम्हालाही वाटेल की मी पण ते तूप खरेदी करावं. मात्र, ते खरेदी करण्यासाठी खिशात भरपूर पैसे असणं गरजेचं आहे. (रिपोर्ट- मुस्तुफा लाकड़ावाला/राजकोट)
राजकोटच्या गोंडलमध्ये तूप दोन लाख रुपये किलो दराने विकलं जात आहे. त्यात इतकं विशेष काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर, हे शुद्ध तूप आहे जे भेसळीशिवाय बनवलं जातं. ते इतर तूपांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. त्याची किंमत 3500 रुपयांपासून सुरू होते आणि 2 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचते. हे तूप खास आहे कारण ते विविध औषधी वनस्पतींचं मिश्रण करून बनवलं जातं.
advertisement
गोंडलमध्ये गिर गौ जतन नावाची संस्था चालवणारे रमेशभाई रुपारेलिया हे तूप विकतात. त्यांच्या गोठ्यात 200 हून अधिक गायी आहेत. ते या गायींचं दूध विकत नाहीत, तर त्यापासून तूप आणि ताक बनवतात. या तुपात मिसळलेल्या औषधांची किंमत प्रति किलो 6 लाख रुपये आहे. ही वनस्पती तुपात मिसळल्याने तुपाची किंमत वाढते. 31 लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement