विधानसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय, राज्यातल्या 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या ओबीसींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या ओबीसींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात आला आहे. हरियाणामध्ये ओबीसी समाजाने भरभरून पाठिंबा दिल्यामुळे भाजपला तिसऱ्यांदा सत्तास्थापन करता आली, त्यामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माधव पॅटर्ननुसार ओबीसी मतदार आपल्या बाजूला राहतील, याची काळजी भाजप घेताना दिसत आहे.
कोणत्या जातींचा ओबीसींमध्ये समावेश?
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. राज्य सुचीतील क. 220 मध्ये अंतर्भाव असलेल्या बडगुजर, सुर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर आणि रेवा गुजर या जातींचा अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये नव्याने समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.
advertisement
तसंच राज्य सूचीच्या क. 216 मधील पोवार, भोयर आणि पवार अशी स्वतंत्र नोंद घेत आयोगाने या ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास अनुमती दिली आहे. कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या बेलदार जातीच्या उपजातींचा राज्य सूचीतील क. १८९ मध्ये समावेश असलेल्या जातींचा राज्य सरकारच्या शिफारसीनुसार आयोगाने नव्याने सुधारणा करीत केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
advertisement
याबरोबरच राज्य सुचीतील क 262 अंतर्गत असलेल्या लोध, लोधा व लोधी आणि क 263 मध्ये समावेश असलेल्या डांगरी या जातीचा सुध्दा राज्य सरकारच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये समावेशास आयोगाने मान्यता दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2024 8:07 PM IST