कुणाच्या बॅगा तर कुणाच्या गाड्या तपासल्या, निवडणूक आयोगाच्या निशाण्यावर विरोधी पक्षातले नेते

Last Updated:
Uddhav Thackeray Bag Checks
Uddhav Thackeray Bag Checks
मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Maharashtra Assembly Election)  वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिरकाऱ्यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टटरमधील बॅगांची तपासणी झाडाझडती घेतल्याने विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. फक्त महाविकास आघआडीच्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात अशी टीका विरोधकांनी केली. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारमतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगा तपासल्याची माहिती समोर आली आहे,
उद्धव ठाकरे हे सभेसाठी वणी येथे दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ अमोल कोल्हेंच्याही बॅगेची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे. अमोल कोल्हे हे विटा येथे सभेला जात असताना त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.यावेळी अमोल कोल्हे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सुप्रिया सुळेंच्या कारची तपासणी झाल्याची माहिती स्वत: सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
advertisement

सुप्रिया सुळेंची कार तपासली

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी पण काल गाडी चेक केली.जरूर आमचं सगळं चेक करावे. उद्धवजींची कशाला केली ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत हे दुर्दैवी आहे. अतिशय चुकीचं आहे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का?
advertisement

अमोल कोल्हे काय म्हणाले?

अमोल कोल्हे म्हणाले, आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे.
मराठी बातम्या/Politics/
कुणाच्या बॅगा तर कुणाच्या गाड्या तपासल्या, निवडणूक आयोगाच्या निशाण्यावर विरोधी पक्षातले नेते
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement