Uddhav Thackeray Eknath Shinde: कोकाटेनंतर महायुतीचा आणखी एक मंत्री गोत्यात, ठाकरेंच्या शिलेदाराचा एकाच वेळी तिघांवर निशाणा!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mahayuti Minister : महायुती सरकारवर हनी ट्रॅपचे आरोप सुरू आहेत. अशातच आता आणखी एक मंत्री गोत्यात अडकला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिलेदारानं एकनाथ शिंदेच्या नेत्यावर आता निशाणा साधला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळत असल्याच्या आरोपांवरून घेरले आहेत. तर, दुसरीकडे महायुती सरकारवर हनी ट्रॅपचे आरोप सुरू आहेत. अशातच आता आणखी एक मंत्री गोत्यात अडकला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिलेदारानं एकनाथ शिंदेच्या नेत्यावर आता निशाणा साधला आहे.
मागील काही दिवसांपासून महायुती चांगलीच बॅकफूटवर गेली असल्याचे दिसून आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील, माजी मंत्री रामदास कदम आणि बंधू सिद्धेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. परब यांनी आता या तिघांवर सावली डान्स बार आणि वाळू प्रकरणात पुन्हा नव्याने कागदपत्रांसह आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
सावली बार प्रकरणात परबांचं ओपन चॅलेंज....
अनिल परब यांनी सावली बार प्रकरणात विधान परिषदेत आरोप केले होते. त्यानंतर परब यांचे आरोप गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी फेटाळून लावले होते. तर, रामदास कदम यांनी परमिट पत्नीच्या नावावर असले तरी डान्स बारशी संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी कदमांवर जोरदार हल्लाबोल केला.
advertisement
अनिल परब यांनी म्हटले की, गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने परमिट असलेल्या ठिकाणी डान्सबार चालतो. पोलीस स्टेशनच्या नाकाच्याखाली तो चालतो. हे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर छापा मारायला जातात. का तर अश्लीलता पसरते म्हणून, अनैतिक धंदा आहे म्हणून, समाजविघातक कृती म्हणून हे रेड करतात. त्याला हरकत नाही, हे चांगलं काम आहे. पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार? असा सवाल त्यांनी केला. या बारवर पोलिसांनी कारवाई केला तेव्हा धाड पडली तेव्हा बारमधील 22 बारबाला, 22 गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मी माहितीच्या अधिकारातंर्गत हा एफआयआर मागवला असून तो खोटा असू शकत नाही, असेही परब यांनी म्हटले. आईच्या नावावर बारचे परमिट काढता आणि बायका नाचवायला लाज नाही वाटत का, असा थेट सवाल परब यांनी केला.
advertisement
पोलिसांनी बारवर कारवाई केला तेव्हा त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे सगळे पुरावे बुधवारी जमा करणार आहोत, त्याशिवाय, कारवाई न केल्यास दर आठवड्याला स्मरण पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बार चालवण्याबाबतच्या सगळ्या नियमांचे उल्लंघन कदम यांनी केले असल्याकडेही अनिल परब यांनी लक्ष वेधले.
परबांचे वाळू माफिया प्रकरणी आरोप....
advertisement
अनिल परब यांनी वाळू तस्करी प्रकरणात कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केला. रत्नागिरीमधील जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय. मला हा गाळ काढू द्या, असं पत्र कदमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं वाळू मिश्रित हा गाळ आहे. यामध्ये वाळू वेगळी केली जाते. ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे. हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचं आहे. जगबुडी नदीतील ही वाळू या योगिता डेंटल कॉलेजजवळ कशी आली?, ही वाळू येथे काय करतेय? असा सवाल त्यांनी केला. जिथे वाळू पडली त्याचे आम्ही जिओ टॅग लावून ड्रोन कॅमेरामार्फत शूट केले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. मी याचे पेन ड्राइव्हही मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही परब यांनी म्हटले. रामदास कदम यांचे आणखी एक पुत्र सिद्धेश कदम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. अनिल परब यांनी प्रदूषण मंडळाच्या छापेमारीच्या कारवाया, नोटीसी कशा जातात, याची देखील माहिती असल्याचे त्यांनी म्हटले..
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Uddhav Thackeray Eknath Shinde: कोकाटेनंतर महायुतीचा आणखी एक मंत्री गोत्यात, ठाकरेंच्या शिलेदाराचा एकाच वेळी तिघांवर निशाणा!