Ajit Pawar Plane Crash: 25 मिनिटांत मुंबईहून बारामती; 'बिझनेस क्लास'चा राजा असलेल्या विमानाचा कसा झाला अपघात?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
अपघात झालेलं हे विमान प्रामुख्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रवासासाठी डिझाइन केलेलं आहे. यात साधारणपणे ८ ते ९ प्रवासी बसू शकतात.
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अत्यंत दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमानाचा तपशील आणि घटनाक्रम: हा अपघात बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून एका विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. 'व्हीएसआर' (VSR) या ऑपरेटरचे 'लिअरजेट ४५' (Learjet 45) श्रेणीतील हे विमान असून, त्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा भीषण अपघात झाला.
advertisement
'बिझनेस क्लास'चा राजा
अपघात झालेलं हे विमान प्रामुख्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रवासासाठी डिझाइन केलेलं आहे. यात साधारणपणे ८ ते ९ प्रवासी बसू शकतात. याची आसनव्यवस्था 'क्लब सीटिंग' पद्धतीची असते, ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणे सोपे जाते.
लिअरजेट ४५ हे त्याच्या वर्गातील सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. हे विमान ताशी सुमारे ८६० किमी वेगाने उडू शकते. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या २०-२५ मिनिटांत कापू शकतं.
advertisement
विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला अनेकदा 'लॅम्बोर्गिनी' असेही म्हटले जाते. कारण याचे इंजिन आणि एरोडायनॅमिक डिझाइन अत्यंत टोकदार आणि चपळ आहे. हे विमान जमिनीपासून ५१,००० फूट उंचीपर्यंत उडू शकते, जी उंची सामान्य व्यावसायिक विमाने (उदा. एअरबस किंवा बोईंग) गाठू शकत नाहीत.या विमानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या धावपट्टीवरही (Short Runways) सहजपणे उतरू शकते. यामुळेच मोठी विमाने जिथे जाऊ शकत नाहीत, अशा बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर हे विमान उतरवण्यासाठी प्राधान्य दिले जाते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Crash: 25 मिनिटांत मुंबईहून बारामती; 'बिझनेस क्लास'चा राजा असलेल्या विमानाचा कसा झाला अपघात?








