उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची खास भेट, पुण्यातून नागपूर, कलबुर्गीसाठी विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Summer Special Train: पुण्याहून नागपूर आणि कलबुर्गीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. उन्हाळी सुट्टीसाठी या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची खास भेट, पुण्यातून नागपूर, कलबुर्गीसाठी विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची खास भेट, पुण्यातून नागपूर, कलबुर्गीसाठी विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. या काळात कुटुंबासमवेत किंवा मित्र-मंडळी बरोबर अनेकजण पर्यटन किंवा इतर कारणांनी प्रवास करत असतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेला होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीसाठी 332 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुण्याहून नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान देखील विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
पुण्याहून नागपूर आणि कलबुर्गीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे उन्हाळी विशेष गाडी चालवणार आहे. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक अति जलद वातानुकूलित विशेष गाडी 8 एप्रिल ते 24 जूनदरम्यान धावणार असून या गाडीच्या एकूण 24 फेऱ्या होतील.
advertisement
नागपूर पुणे गाडीचं वेळापत्रक
गाडी क्रमांक 01469 ही साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर मंगळवारी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता नागपूरला पोहचेल. गाडी क्रमांक 01470 ही वातानुकूलित विशेष गाडी नागपूरमधून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुणे येथे पोहचेल. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांच्या 24 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
गाडी क्रमांक 01467 ही गाडी 9 एप्रिल ते 29 जूनदरम्यान आठवड्याच्या बुधवारी पुणे पुण्यातून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 09468 साप्ताहिक विशेष 10 एप्रिल ते 26 जून दरमान आठवड्याच्या दर गुरुवारी सकाळी 8 वाजता नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पोहचेल. दरम्यान, पुणे-नागपूर उन्हाळा स्पेशल गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भूमावाद, मलकापूर, शेगाव, अकोला, बदने, धामणगाव थांबे असतील.
advertisement
दौंड -कलबुर्गी अनारक्षित विशेष
दौंड ते कलबुर्गी दरम्यान आठवड्यातून 5 दिवस अनारक्षित विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवार आणि रविवार वगळता इतर 5 दिवस ही गाडी धावणार असून 5 एप्रिल ते 2 जुलै 2025 दरम्यान 128 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01421 ही पहाटे 5 वाजता दौंडहून सुटेल आणि त्याच दिवशी 11.20 वाजता कलबुर्गीला पोहोचेल. तर 01422 ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी 4.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता दौंडला पोहोचेल.
advertisement
उन्हाळी सुट्टीत दौंड ते कलबुर्गी अनारक्षित विशेष द्विसाप्ताहिक गाड्याही चालवण्यात येणार आहेत. 3 एप्रिल ते 29 जून दरम्यान या गाडीच्या 52 फेऱ्या होतील.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची खास भेट, पुण्यातून नागपूर, कलबुर्गीसाठी विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement