नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा, किती रूपयांनी बांधकाम साहित्य स्वस्त?

Last Updated:

केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर (GST) चे नवे दर लागू केले आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंप्रमाणेच बांधकाम साहित्याच्या किमतीतही घट झाली आहे.

+
सिमेंट 

सिमेंट 

पुणे : केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर (GST) चे नवे दर लागू केले आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंप्रमाणेच बांधकाम साहित्याच्या किमतीतही घट झाली आहे. विशेषतः सिमेंटच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील 15 वर्षांपासून बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणारे भास्कर जाधव यांनी सांगितले की, सिमेंटवर पूर्वी लागू असलेला 28 टक्के जीएसटी आता 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या दरकपातीमुळे प्रति बॅग सिमेंट 25 ते 30 रुपयांनी स्वस्त झाले आहे. उदाहरणार्थ, बिर्ला सुपरची एक बॅग जी पूर्वी 375 रुपयांना मिळत होती ती आता 350 रुपयांना मिळत आहे. तर JK सुपर सिमेंटच्या बॅगेची किंमत पूर्वी 320 रुपये होती ती आता 300 रुपयांवर आली आहे.
advertisement
या दरकपातीमुळे बाजारात मागणी वाढत असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. बांधकामासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सिमेंटची किंमत कमी झाल्याने सामान्य ग्राहकांपासून लहान-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपर्यंत सर्वांना थेट फायदा होणार आहे. घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
स्टीलसारख्या महत्त्वाच्या बांधकाम साहित्याच्या जीएसटी दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोखंडी सळईच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. वाळू, रेती यांसारख्या इतर साहित्याच्या किमती स्थानिक बाजारपेठेवर आणि उपलब्धतेवर अवलंबून असल्याने त्यात लक्षणीय घट झालेली नाही. मात्र सिमेंटमध्ये झालेली कपात बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा मानली जात आहे.
advertisement
सरकारने केलेल्या या जीएसटी फेरबदलाचा उद्देश म्हणजे नागरिकांना आवश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देणे हा आहे. बांधकाम साहित्य स्वस्त झाल्यामुळे चालू असलेली बांधकामे गतीमान होतील, तसेच नवीन प्रकल्पांना देखील चालना मिळेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सध्या पुणे आणि आसपासच्या भागात गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सिमेंटच्या दरांमध्ये झालेली घसरण ही बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार दोघांसाठीही शुभसंकेत ठरत आहे. सरकारचा हा निर्णय आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा, किती रूपयांनी बांधकाम साहित्य स्वस्त?
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement