सरत्या वर्षाला निरोप, नव्या वर्षाची ओढ; पुण्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीत घडली भयंकर घटना, तरुणाने गमावला जीव
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.
पुणे, गणेश दुडम, प्रतिनिधी : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयूर भाटी असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तो आपल्या मित्रांसोबत इथे आला होता.
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण योजना आखत असतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण धरणे, नदी, समुद्र अशा जलाशयाच्या ठिकाणी मुक्काम करतता. इथेच थर्टी फर्स्टची पार्टी देखील रंगते. मात्र काही वेळेस दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये अनेकांचा जीव जातो. अशीच एक घटना समोर आली आहे.
मयूर भाटी या तरुणाचा इंद्रायणी नदीत बूडून मृत्यू झाला आहे. मयूर हा आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आला होता. यावेळी मयूर हा पाण्यात पोहोण्यासाठी उतरला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बु़डून मृत्यू झाला. सोबत आलेल्या मित्रांना मयूर बुडाल्याचे समजताच त्यांनी मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना बोलावलं, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयूरचा मृतदेह नदीबाहेर काढला.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
January 01, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सरत्या वर्षाला निरोप, नव्या वर्षाची ओढ; पुण्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीत घडली भयंकर घटना, तरुणाने गमावला जीव