पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीत मोठे बदल

Last Updated:

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरात ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त, १७ मुख्य रस्ते बंद, वाहतूक बदल, नो पार्किंग झोन आणि जड वाहनांना प्रवेशबंदी लागू.

Pune News Fergusson road AI Traffic
Pune News Fergusson road AI Traffic
पुणे, अभिजित पोते, प्रतिनिधी: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, शहरात ८ हजारांहून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल केले आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतूक नियमांसंबंधीचा एक विशेष व्हिडिओ देखील जारी केला आहे.
वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील १७ मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, १० मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी 'नो पार्किंग झोन' जाहीर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवसांदरम्यान शहरात जड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असेल.
advertisement
advertisement
या सर्व बदलांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहील आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पुणे वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रोड, प्रभात रोड, हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीत मोठे बदल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement