Pune Crime News : मोहोळ गँगचा म्होरक्या ते राजकारण व्हाया हिंदू डॉन; शरद मोहोळचा कसा झाला The End

Last Updated:

Sharad Mohal : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूडच्या सुतारदरा परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

शरद मोहोळचा कसा झाला The End
शरद मोहोळचा कसा झाला The End
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं गोळीबार केला. यात मोहोळला चार गोळ्या लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येनंतर पुण्यातील गँगवार पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मृत शरद मोहोळ टोळीचा म्होरक्या कसा झाला? ही एक चित्रपटासारखी कथाच आहे.
कुख्यात गुंड ते हिंदुत्ववाद्यांचे व्यासपीठ
शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदिप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ आहे. 2007 ला संदिप मोहळचा गणेश मारणे टोळीने खून केला. गणेश मारणे सोबत सचिन पोटेही आरोपी आहे. संदीपची गाडी चालवत असलेल्या शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली. (गजा मारणे टोळीचा काही संबंध नाही. ही आंदगावची मारणे टोळी). 2010 ला शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॅाकीजजवळ खून केला.
advertisement
लवळेगावच्या सरपंचाचं किडनॅपिंग आणि रॅाबरीमध्ये देखील शरद मोहोळ प्रमुख आरोपी आहे. तेव्हापासून शरद येरवडा जेलमध्ये होता. 2012 मध्ये जेलमध्ये जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महंमद कातील सिद्दीकीचा बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे हिंदुत्ववादी डॅान असल्याचं सांगत होता. यानंतर तो हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर कार्यक्रमांना दिसत होता. दीड वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला. राजकीय वाटचालीसाठी भाजपची निवड केली. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पत्नी स्वाती मोहोळने भाजप प्रवेश केला. त्यांची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. पत्नीला नगरसेवक करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. राजकीय महत्वकांक्षेनंतर गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या. मात्र, आज लग्नाच्या वाढदिवशीच खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
वर्षभरापूर्वीच दोन गँगमध्ये टोळीयुद्ध
पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये व्यावसाईक वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime News : मोहोळ गँगचा म्होरक्या ते राजकारण व्हाया हिंदू डॉन; शरद मोहोळचा कसा झाला The End
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement