काळजी घ्या! महाराष्ट्रात येतेय उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून, काही भागात तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, कोरड्या हवामानाचा प्रभाव दिसून येईल.
मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून, काही भागात तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, कोरड्या हवामानाचा प्रभाव दिसून येईल. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान जास्त राहील, तर कोकणात दमटपणा कायम राहील. पाहुयात 26 मार्च रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमधील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
प्रमुख शहरांचा विचार केल्यास, मुंबईत 26 मार्च रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस असेल. नागपुरात उष्णता अधिक जाणवेल, जिथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. नाशिकमध्ये किमान 16 अंश आणि कमाल 38 अंश सेल्सिअस तापमान अपेक्षित आहे, तर छत्रपती संभाजीनगरात किमान 19 अंश सेल्सिअस आणि कमाल 39 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, भरपूर पाणी पिणे आणि हलके कपडे वापरण्याची शिफारस केली आहे. कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. विदर्भात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहील. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठीही सूचना दिल्या आहेत. एकंदरीत 26 मार्च रोजी महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
March 25, 2025 8:24 PM IST

