Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक पडली बंद; बोनट ओपन केलेल्या कारच कार, video आला समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ अशा सलग सुट्या लागून आल्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी बाहेर पडले.
पुणे, 26 डिसेंबर : शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ अशा सलग सुट्या लागून आल्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी बाहेर पडले. पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती मिळाली ती लोणावळा, पुणे आणि कोकणातील पर्यटन स्थळांना, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
दुसरीकडे वाहातूक सुरळीत करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. बोरघाटात 10 किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने अचानक बंद पडल्याची घटना समोर आली होती. मुंबई-पुणे मार्गावर पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडले. वाहनं अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. महिला आपल्या लहान मुलांसह टोविंग व्हॅन व मेकॅनिकच्या प्रतिक्षेत रस्त्यावर बसल्याचं चित्र होतं. तर चालक आपल्या गाड्यांचं बोनट ओपन करून वाहनाला धक्का मारताना दिसते.
advertisement
advertisement
आता त्याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. महामार्गवर शेकडो वाहने बंद पडली आहेत, आणि त्या वाहनाचं बोनट चालकांनी ओपन केलं आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आतील यंत्रणा ओव्हर हिटिंग होत असल्यानं तिला थंड करण्यासाठी चालकांनी बोनट ओपन केलं होतं.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
December 26, 2023 12:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक पडली बंद; बोनट ओपन केलेल्या कारच कार, video आला समोर