Mumbai-Pune Expressway Update : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तास बंद राहणार वाहतूक

Last Updated:

Mumbai-Pune Express Way News : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 6 तास वाहतूक बंद असणार आहे.

पुण्याला जाणाऱ्यांसाठी खास अपडेट
पुण्याला जाणाऱ्यांसाठी खास अपडेट
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून गुरुवार 18 जानेवारी रोजी वाहतूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 6 तास वाहतूक बंद असणार आहे. पनवेल कर्जत दुहेरी मार्गाचे काम 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान करण्यात येणार आहे.
कामाच्या वेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असेल. हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक किमी 55 वरून वळवण्यात येईल. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग 46 वरून वाहने नेता येतील.
पुण्याकडून मुंबईला येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवण्यात येऊन ती एनएच 48 वरून करंजाडे मार्गे कळंबोली आणि एनएच48 वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने पुढे जातील. मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार असून हलकी वाहने आणि बसेस मुंबई मार्गिकेवर किमी 39.800 खोपोली एक्झिटवरून
advertisement
एनएच48 वर येतील. तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व वाहने खालापूर एक्झिटवरून एनएच 48 वर आणि खोपोली शहरातून शेडुंग टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने नेता येतील.
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway Update : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तास बंद राहणार वाहतूक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement