'महायुती सरकारचा लाडका गुंड...'; गजा मारणे, चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

Last Updated:

कुख्यात गुंड गजानन मारणे याने चंद्रकांत पाटलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, आता यावरून वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

News18
News18
पुणे, प्रतिनिधी : कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणेने चंद्रकांत पाटलांचा सत्कार केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तर चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत, दरम्यान आता यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत या भेटीवर निशाणा साधला आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार? 
'‘लाडके गुंड‘ कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले. पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती.' असं ट्विट विरोधी पक्षनेत वडेट्टीवार यांनी केलं आहे.
मराठी बातम्या/पुणे/
'महायुती सरकारचा लाडका गुंड...'; गजा मारणे, चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर वडेट्टीवारांचा खोचक टोला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement