Pune News : भरतीवेळी धावता धावता कोसळला, डिहायड्रेशन नंतर ओढावला मृत्यू; नेमकं काय घडलं?

Last Updated:

पुणे शहर पोलीस भरतीवेळी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव तुषार बबन भालके असं आहे. तुषार हा मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे.

News18
News18
चंद्रकांत फुंदे, पुणे : राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून यात उमेदवारांची मैदानी चाचणी टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. या चाचणीवेळी प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. धुळ्यानंतर आता पुण्यात एका तरुणाचा मैदानी चाचणीवेळी मृत्यू झाला आहे. खाकी वर्दी मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून धावणाऱ्या तरुणांच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेवेळी संगमनेरच्या तरुणाचा मृत्यू झाला.
भरती प्रक्रियेतून पोलीस सेवेत दाखव व्हायचं आणि खाकी वर्दी घालायच्या स्वप्नासाठी तरुण रात्रंदिवस कष्ट करतात. मैदानी चाचणीसाठी घाम गाळून धावतात, कसरत करणाऱ्या तरुणांचा मैदानावरच असा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. पुणे शहर पोलीस भरतीवेळी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव तुषार बबन भालके असं आहे. तुषार हा मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे. अवघ्या २७ वर्षांच्या तुषारला धावताना चक्कर आली. त्यानंतर त्याला तातडीने ससूनमध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारावेळीच त्याची प्राणज्योत मालवली.
advertisement
पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तुषार भालके याची मैदानी चाचणी सकाळी ८ वाजता होती. त्याचे तीन राऊंड पूर्ण केल्यानंतर पायात क्रँम्प आले आणि मसल ब्रेक झाले. यामुळे तुषार मैदानावरच धावता धावता कोसळला. मैदानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला ससूनमध्ये नेलं. मात्र डिहायड्रेशन होऊन तुषारच्या किडनी फेल झाल्या होत्या. त्यानंतर हृदय बंद पडलं. तुषारचे इतर अवयवही काम करायचे बंद झाले आणि उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
आतापर्यंत राज्यात पोलीस भरती प्रक्रियेवेळी तरुणाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी एसआरपीएफच्या भरतीत मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुण्यात तिसरी घटना घडली आहे. धुळ्यातून मुंबईत भरतीसाठी आलेल्या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. तर त्याआधी अमळनेरमधील तरुणाचा मृत्यू झाला होता. भरती प्रक्रियेदरम्यान मुंबईत अनेक जणांची प्रकृती बिघडली. यापैकी ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : भरतीवेळी धावता धावता कोसळला, डिहायड्रेशन नंतर ओढावला मृत्यू; नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement