Pune Crime: तरुणीवर अत्याचार करून पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या कुरिअर बॉयला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pune Crime News: पुण्यातील कोंढव्यात 25 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या कुरिअर बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पुणे : पुण्याच्या कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या कुरिअर बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपला कोथरूड आणि बाणेर परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी झालेल्या या घटनेमुळे फक्त शहरच नाही तर पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
ही घटना बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता घडली. आरोपीने कुरियर डिलिव्हरी बॉय म्हणून महिलेच्या सोसायटीत प्रवेश केला. महिलेने तिच्या नावाने कुरियर नसल्याचे सांगितले तरी त्याने जबरदस्ती सही गरजेची असल्याचं सांगितले. यानंतर महिलेने दार उघडलं तेव्हा कुरिअर पिन घेण्यासाठी आरोपी घरात शिरला. यानंतर त्याने दार बंद करून महिलेवर अत्याचार केले, असा आरोप आहे.
advertisement
अटक करण्यात आलेल्या आरोपीची स्वत: अतिरिक्त आयुक्त चौकशी करत आहेत. या आरोपीला कशी अटक केली हे अद्याप समजू शकेल नाही. विशेष म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील पुण्यात आहेत. या घटनेमुळे पुणे पोलिसांवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. या आरोपीला शोधण्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली होती. संबंधित आरोपी हा महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता असे समजते.
advertisement
या आरोपीने तरुणीवर अत्याचार करण्याआधी तिच्या चेहऱ्यावर कोणतातरी स्प्रे मारला होता. एवढच नाही तर त्याने महिलेचा मोबाईल वापरून सेल्फीही काढला, तसंच 'मी परत येईन', असा मेसेजही त्याने तिकडे लिहिला. ही घटना घडली तेव्हा तरुणी घरात एकटी होती आणि तिचा भाऊ शहराबाहेर गेला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 04, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: तरुणीवर अत्याचार करून पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या कुरिअर बॉयला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई