'बॉर्डर 2' पाहून येईपर्यंत घरात घुसला 'शत्रू'! पुण्यातील हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग परिसरात चोरीची घटना उघड झाली आहे. यात हवाई दलातील एका अधिकाऱ्याचे घर फोडून लाखांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
पुणे : पुण्यातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) परिसरात चोरीची घटना उघड झाली आहे. यात हवाई दलातील एका अधिकाऱ्याचे घर फोडून लाखांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी आपल्या कुटुंबासह 'बॉर्डर २' सिनेमा पाहायला गेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली.
नेमकी घटना काय?
भारतीय हवाई दलात कार्यरत असलेले मुकेशकुमार सुधेश्वर सिंग (४३) हे दापोडी येथील सीएमई कॅम्पसमध्ये वास्तव्यास आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते सायंकाळी ६ वाजता 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता, घराचा दाराचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला.
advertisement
साडेचार लाखांची लूट: अज्ञात चोरट्याने सिंग यांच्या घरात शिरून कपाटातील सोन्याचा हार, चैन, अंगठी, मंगळसूत्र आणि ब्रेसलेट असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. लष्करी संस्थेच्या सुरक्षित आवारातच ही चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुकेशकुमार सिंग यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये चोरट्यांनी शिरकाव कसा केला, याचा तपास पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केला जात आहे.
advertisement
पुण्यात एकतर्फी प्रेमातून हत्या
पुणे जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून झालेल्या एका थरारक दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. दोन दिवसांत दोन खून करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सुपा पोलिसांनी अटक केली असून, त्याने यापूर्वीही तीन खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जैतू चिंधू बोरकर (४३, रा. खेड) असे या विकृत आरोपीचे नाव आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 9:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'बॉर्डर 2' पाहून येईपर्यंत घरात घुसला 'शत्रू'! पुण्यातील हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड







