Pune Crime : पुण्यात घराच्या मागे सापडला मृतदेह, पोलिसांना एक हिंट लागली अन् 12 तासात उलगडलं खुनाचं रहस्य!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune katraj Crime Body Found : पोलिसांनी मृताच्या मोबाईल नंबरचा मागोवा घेतला आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने 12 तासांच्या आत विक्रमाला शोधून काढलं.
Pune Crime News : पुण्याच्या कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात गच्च गवतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मृतदेहाने संपूर्ण भागात रहस्य आणि भयाचे वातावरण निर्माण केले होते. पण भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या हत्येमागील भयाण सत्य उघडकीस आणलं आहे, ज्यानुसार मृताच्या मित्रानेच त्याचे क्रूरतेने आयुष्य संपवलं होतं. पैशांचा वाद आणि सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून एका मित्राने दुसऱ्याचा 'काटा' काढल्याचं या तपासात समोर आलं आहे.
टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने आरोपीला अटक
खून केल्यानंतर विक्रमने कोणालाही संशय येऊ नये म्हणून सद्दामचा मृतदेह खोलीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या गवताळ जागेत फेकून दिला आणि स्वतः पळ काढला. मात्र, शनिवार दुपारपासून सुरू झालेल्या पोलीस तपासाने आरोपीला जास्त वेळ मिळू दिला नाही. पोलिसांनी मृताच्या मोबाईल नंबरचा मागोवा घेतला आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने 12 तासांच्या आत विक्रमाला शोधून काढलं.
advertisement
मित्राच्या क्रूर हत्येचे गूढ उकललं
रविवारी गुजरवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी कसून चौकशी करताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मित्राच्या क्रूर हत्येचे हे गूढ उकललं. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्यासह टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीविरोधात पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दोघांमध्ये जोरदार भांडण झालं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम ऊर्फ सलमान शेख (35 वर्षे) या व्यक्तीचा खून झाला होता, तर त्याचा रुममेट विक्रम चैठा रोतिया (32 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम आणि विक्रम रोजंदारीवर काम करणारे मजूर होते आणि ते एकाच खोलीत राहत होते. त्यांची मैत्री पैशांच्या वादामुळे आणि सद्दामच्या त्रासामुळे हाणामारीत बदलली. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्याचे रूपांतर विक्रमाने सद्दामचा जीव घेण्यापर्यंत झालं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 13, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात घराच्या मागे सापडला मृतदेह, पोलिसांना एक हिंट लागली अन् 12 तासात उलगडलं खुनाचं रहस्य!