Pune Crime : डेटवर जाण्यास तरुणीचा नकार! AI चा वापर करत तरुणाने केला भयंकर कांड, पुण्यासह मुंबईही हादरलं!

Last Updated:

Pune Crime News : चिरागने तरुणीकडे गर्लफ्रेंड बनून डेटवर येण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराने संतापलेल्या आरोपीने लगेचच सूडाचा मार्ग निवडला.

Young man commits horrific crime using AI
Young man commits horrific crime using AI
Pune Crime News : सध्या चॅट जीपीटी असो वा जेमिनी... एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलंय. सर्वसामान्यांना एआयचा वापर फुकटमध्ये करता येत असल्याने आता डिजिटल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. अशातच डिजिटल जगात ऑनलाइन ओळखीचा फायदा घेऊन एका तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका 21 वर्षीय संशयिताला पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुंबईतील विरारमधून ताब्यात घेतले आहे.

तरुणीने स्पष्टपणे नकार दिला अन्...

चिराग राजेंद्र थापा असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची सुरुवात एका ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर झाली होती, जिथं चिरागची ओळख पीडित तरुणीशी झाली होती. ओळखीनंतर एका आठवड्यातच चिरागने तरुणीकडे गर्लफ्रेंड बनून डेटवर येण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराने संतापलेल्या आरोपीने लगेचच सूडाचा मार्ग निवडला. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून तरुणीचे अश्लील फोटो तयार केले.
advertisement

आक्षेपार्ह फोटो तयार केले अन्....

या कृतीवर न थांबता, चिरागने तिच्या नावाने 13 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट्स उघडून ते अश्लील फोटो व्हायरल केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिच्या मैत्रिणींचेही असेच आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि तरुणीला धमक्या दिल्या की, तिने मैत्रिणींना 'माझ्याशी बोलायला सांगा' अन्यथा हे फोटोही व्हायरल करेन.
advertisement

चिराग थापाला विरारमधून अटक

या गंभीर प्रकारानंतर तरुणीने बावधन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच तपास सुरू केला. टेक्निकल अ‍ॅनालिसिस आणि सायबर तपासाच्या आधारावर पोलिसांनी तातडीने आरोपीचा माग घेतला. अवघ्या काही तासांतच चिराग थापाला विरारमधून अटक करण्यात आली. AI टेक्नॉलॉजीच्या वाढत्या गैरवापरातून घडलेला हा गुन्हा आणि त्यावर पोलिसांनी केलेली जलद कारवाई सायबर गुन्हेगारांसाठी एक कडक संदेश देणारी आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : डेटवर जाण्यास तरुणीचा नकार! AI चा वापर करत तरुणाने केला भयंकर कांड, पुण्यासह मुंबईही हादरलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement