Pune News: चोरट्यांनी देवालाही नाही सोडलं; खंडोबा मंदिरात 35 लाखांची चोरी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गावाजवळील डोंगरावर असलेल्या या मंदिरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला.
राजगुरुनगर : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता मंदिरातील चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खरपुडी खंडोबा मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात त्यांनी साडेतीन लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण आहे. पुजारी राजेश गाडे यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गावाजवळील डोंगरावर असलेल्या या मंदिरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. चोरट्यांनी खंडोबा, म्हाळसा आणि बानू यांच्या मूर्तींवर असलेले चांदीचे हार, उत्सवमूर्ती, स्वयंभू पिंडीचा चांदीचा कवच, देवाची पगडी, चांदीचे सहा हार, बानू-म्हाळसाचा मुकुट आणि सिंहासन वाघ मूर्ती यासह सुमारे १९ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या. या चांदीच्या ऐवजाची किंमत अंदाजे ३५ लाख रुपये इतकी आहे. चांदीच्या दागिन्यांसोबतच चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे १ लाख रुपये रोख रक्कम देखील चोरून नेली.
advertisement
पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजा करण्यासाठी मंदिरात आले असता चोरीची ही घटना उघडकीस आली. खरपुडी व्यतिरिक्त याच चोरट्यांनी होलेवाडी येथील मळूआई देवीच्या मंदिरालाही लक्ष्य केले. तेथूनही देवीचा चांदीचा मुकुट आणि हार असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. विशेष म्हणजे, चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, मात्र खरपुडी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याची बाब यावेळी समोर आली आहे. यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 11:14 AM IST


