SBI चं YONO ऍप अपडेट करायला गेला आणि पुण्यातील मनोजच्या खात्यातून उडाले 1 लाख 90 हजार रुपये, काय घडलं कसं घडलं?

Last Updated:

हे ठग मंडळी टेक्नोलॉजीचा फायदा घेत लोकांना गंडा घालू लागले आहेत. असाच प्रकार पुण्यातील मनोज सोबत घडला.

Fraud
Fraud
पुणे : ऑनलाईन बँकिंगमुळे लोकांचं आयुष्य अगदी सोपं झालं आहे. यामुळे लहान-सहान कामांसाठी बँकेत जावं लागत नाही आणि तिथे लाइन लावून वेळ घालवावा लागत नाही. ज्यामुळे लोकांचा वेळ वाचला आहे. लोक कधीही आणि कुठूनही आपलं बँकेशी संबंधीत काम करु लागले आहेत. पण टेक्नोलॉजीनं आपलं काम जितकं सोपं केलं आहे. तितकंच ते फसवणूक करणाऱ्यांसाठी सोपं झालं आहे. हे ठग मंडळी टेक्नोलॉजीचा फायदा घेत लोकांना गंडा घालू लागले आहेत. असाच प्रकार पुण्यातील मनोज सोबत घडला.
पुण्यातील सोमवारी पेठेतील मनोज सोपान शिंदे यांना 14 सप्टेंबरच्या संध्याकाळी एक फोन आला. समोरचा अनोळखी माणूस स्वत:ला मुंबई शाखेतील SBI चा अधिकारी म्हणवून घेत होता. त्याचा आवाज इतका खात्रीशीर होता की, कोणीही ते ऐकून त्यावर विश्वास ठेवेल असं मनोजनं सांगितलं. मनोज म्हणाला की मला कॉलवरील व्यक्तीनं सांगितलं की, "सर, तुमचं YONO SBI अॅप अपडेट करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक फाइल पाठवतो, ती डाउनलोड करून ओपन करा."
advertisement
मनोज शिंदे यांनी त्या कर्मचाऱ्यानं सांगितलं तसं केलं आणि काही क्षणांतच त्यांच्या खात्यातून तब्बल 1 लाख 90 हजार रुपये गायब झाले. पुढच्या क्षणाला फोन कट झाला, पण शिंदे यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे पैसे एका क्लिकमध्ये गेले होते. ज्यामुळे मनोजच्या पायाखालची जमीन सरकली.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी कोण, कुठला याचा शोध सुरू आहे. पण या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की फसवणूक करणाऱ्यांचे डावपेच किती चलाख झालेत आणि आपल्याला किती सतर्क रहाण्याची गरज आहे.
advertisement
आजवर अशा कितीतरी घटना समोर आल्या आहेत. नावं वेगळी, पद्धती वेगवेगळ्या, पण फसवणुकीची गोष्ट तीच तुमच्या पैशावर डोळा
अशावेळी काय करावं आणि काय करु नये? या गोष्टी लक्षात ठेवा
-बँकेचे अधिकारी कधीही तुम्हाला फोन करून फाइल किंवा लिंक डाउनलोड करायला सांगत नाहीत.
-YONO किंवा इतर कोणतेही बँकिंग ऍप अपडेट करायचं असेल तर फक्त अधिकृत ऍप स्टोअरवरूनच करा.
advertisement
-अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल किंवा मेसेजवर कधीही विश्वास ठेवू नका.
-खाते क्रमांक, पासवर्ड, ओटीपी ही माहिती अगदी बँकेच्या कर्मचाऱ्यालाही सांगू नका.
फसवणूक झालीच तर?
- लगेच 1930 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.
-जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.
-विलंब करू नका, कारण अशा केसमध्ये प्रत्येक मिनिटं महत्वाचे असतात.
मराठी बातम्या/पुणे/
SBI चं YONO ऍप अपडेट करायला गेला आणि पुण्यातील मनोजच्या खात्यातून उडाले 1 लाख 90 हजार रुपये, काय घडलं कसं घडलं?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement