Pune : 'आडमुठेपणा करू नका...', अधिकाऱ्यांना झापल्यानंतर अजितदादांनी कुणाला फोन फिरवला? पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar Angry On PMC Officers : पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा आणि सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.
Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar Angry On PMC Officers) पहाटे पहाटे वारजे आणि आसपासच्या परिसराचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी कात्रज परिसरातील समस्यांचं निर्वाहन देखील केलं. पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा आणि सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रमुख नेत्यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार संतापल्याचं पहायला मिळालं.
आडमुठेपणा करू नका...
कात्रज परिसरात पाहणीदरम्यान, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या नेत्यांनी महावितरण आणि पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचं पहायला मिळालं. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत "आडमुठेपणा करू नका, कामे मार्गी लावा," अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
अधिकाऱ्याला फोन लावला अन्...
advertisement
"लागलं तर नवीन सब-स्टेशन उभारा, पण नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत करा," असे आदेश दिले गेले. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नागरिकांच्या समोरच महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन लावला अन् स्पष्टीकरण मागितलं. तसेच समस्येचं निवारण करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत.
कात्रजमध्ये वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अजित पवार यांनी महावितरण आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना झापलं pic.twitter.com/aqN5wvS7Rt
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2025
advertisement
लागलीच सब-स्टेशन उभारा, अजित पवारांचे निर्देश
पुणे महानगरपालिकेकडून (PMC) सब-स्टेशन उभारण्यासाठी तातडीने जागा मंजूर करून घेतली. "लागलीच सब-स्टेशन उभारा आणि सर्व कामे त्वरित पूर्ण करून घ्या," असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
advertisement
दरम्यान, अजित पवार यांच्याकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात देखील पाहणी झाली. वारजे - शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील हा शिवने पूल सगळ्यात आधी पाण्याखाली जातो. याच शिवणे पुलाची उंची वाढवण्यासाठी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 11, 2025 8:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : 'आडमुठेपणा करू नका...', अधिकाऱ्यांना झापल्यानंतर अजितदादांनी कुणाला फोन फिरवला? पाहा Video