Pune Parking: पुण्यात पार्किंगच गेलं चोरीला, नागिरकांची थेट पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Pune Parking: पुण्यात एका गृहप्रकल्पातील पार्किंगच चोरीला गेल्याची तक्रार रहिवाशांनी पोलिसांत केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Pune Parking: पुण्यात पार्किंगच गेलं चोरीला, नागिरकांची थेट पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?
Pune Parking: पुण्यात पार्किंगच गेलं चोरीला, नागिरकांची थेट पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?
पुणे : पुण्यातील अनेक भागांमध्ये पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच भोसरीतील पीएमआरडीएच्या सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पातही पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रकल्पात पुरेशा पार्किंगची व्यवस्था नसल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच प्रशासनाकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्रस्त रहिवाशांनी थेट पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. आमचं पार्किंग कुठे गायब झालंय? शोधून देता का? असा सवाल करत रहिवाशांनी आपल्या हक्काच्या पार्किंगसाठी न्याय देण्याची मागणी केली आहे.
पीएमआरडीए पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रकल्पात पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने रहिवाशांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रमाणात पार्किंग देण्यात आले नसल्यामुळे वाहन पार्क करण्यावरून वादाची परिस्थिती निर्माण होत आहे.
advertisement
दोन ते तीन फ्लॅटसाठी एकच पार्किंग
फ्लॅट धारकांच्या मते, प्रत्यक्षात दोन ते तीन फ्लॅटसाठी केवळ एकच पार्किंगची सोय आहे. या बाबत पीएमआरडीए प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असला, तरीही काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. पहिल्या टप्प्यातील फ्लॅटचे वाटप पूर्ण झाले असून, टप्प्याटप्याने घरांचा ताबा दिला जात असल्याने रहिवाशांची संख्या वाढली आणि पार्किंगचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
advertisement
रहिवाशांनी चुकीच्या पार्किंग आराखड्याबद्दलही प्रशासनावर आरोप केला आहे. पार्किंगच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असली तरी, समस्येवर ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही.
तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासनाने पार्किंगच्या समस्येकडे लक्ष दिलं आहे. सेक्टर 12 येथील पार्किंगचा नकाशा बदलून नव्याने आखणी करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता रश्मी पाटील यांनी दिली. सभासदांच्या तक्रारीनुसार आणि त्यांच्या सूचनांचा विचार करून ही नवीन आखणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Parking: पुण्यात पार्किंगच गेलं चोरीला, नागिरकांची थेट पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement