पुणेकर ट्राफिक विसरा! 7 हजार 500 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, येरवडा ते कात्रज अवघ्या 30 मिनिटांत

Last Updated:

Pune News: पुणेकरांची वाहतूक कोंडीच्या कटकटीतून सुटका होणार आहे. येरवडा ते कात्रज 7 हजार 500 कोटींचा गेमचेंजर प्लॅनची तयारी सुरू आहे.

Pune News: पुणेकर ट्राफिक विसरा! 7 हजार 500 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, येरवडा ते कात्रज अवघ्या 30 मिनिटांत
Pune News: पुणेकर ट्राफिक विसरा! 7 हजार 500 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, येरवडा ते कात्रज अवघ्या 30 मिनिटांत
पुणे : पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. येरवडा ते कात्रज दरम्यान सुमारे 20 किलोमीटर लांबीचा थेट भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून, या प्रकल्पाच्या व्यवहार्यता पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या भुयारी महामार्गासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुण्यातील वाहनसंख्या झपाट्याने वाढत असताना जमिनीवरील रस्ते रुंदीकरणाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे जमिनीखालील पर्यायांचा विचार करत हा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारा एक वेगवान आणि थेट दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
हा भुयारी मार्ग शहराच्या सर्वांत गजबजलेल्या मध्यवर्ती भागातून जाणार असून, दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा करता येईल, अशी रचना करण्यात येणार आहे. मार्ग कुठून सुरू होईल, कुठे बाहेर पडण्याचे पर्याय असतील, एकूण खर्च किती येईल, हा मार्ग सातारा व नगर महामार्गाशी कसा जोडता येईल, तसेच खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविता येईल का, यासह अनेक बाबींचा सविस्तर अभ्यास या अहवालातून करण्यात येणार आहे.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, येरवडा ते कात्रज या भुयारी मार्गावर तीन ठिकाणी इन-आऊटचे पर्याय असतील. हा रस्ता सुमारे 30 मीटर खोल जमिनीखालून प्रस्तावित असून, भूमिगत मेट्रो प्रकल्पाला कोणतीही बाधा येणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
या भुयारी मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन येरवडा ते कात्रज हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करणे शक्य होईल. वेगवान वाहतूक, इंधन बचत, तसेच वायू व ध्वनिप्रदूषण कमी होण्यासही या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर ट्राफिक विसरा! 7 हजार 500 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, येरवडा ते कात्रज अवघ्या 30 मिनिटांत
Next Article
advertisement
ZP Election: ...तर गेम ओव्हर! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या निर्णयाने राजकारण तापलं
...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या
  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

View All
advertisement