Crime : 'मोस्ट वॉन्डेट'च्या पावलावर पाऊल ठेऊन निलेश घायवळ देश सोडून पळाला? गुप्तचर संस्था अ‍ॅक्शन मोडवर!

Last Updated:

Rashid Cablewala detained in Azerbaijan : गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) आरोप लावला होता. परंतु 2022 मध्ये तो बनावट पासपोर्ट वापरून दुबईला पळून गेला.

Rashid Cablewala detained in Azerbaijan
Rashid Cablewala detained in Azerbaijan
Rashid Cablewala detained in Azerbaijan : दिल्लीच्या अंडरवर्ल्डमध्ये दहशतीचे समानार्थी असलेला फरार गुंड रशीद केबलवाला अखेर अटक करण्यात आली आहे. तुर्कीच्या इस्तंबूलहून अझरबैजानमध्ये पोहोचल्यानंतर बाकूच्या हैदर अलीयेव आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या प्रवास कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता निलेश घायवळ याचं कनेक्शन आहे का? असा सवाल विचारला जातोय.

बनावट पासपोर्ट वापरून दुबईला पळाला

2019 मध्ये गुन्हे शाखेने त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) आरोप लावला होता. परंतु 2022 मध्ये निलेश घायवळप्रमाणे तो बनावट पासपोर्ट वापरून दुबईला पळून गेला. लॉरेन्स बिश्नोईने साबरमती तुरुंगातून व्हिडिओ कॉलद्वारे हाशिम बाबाला सूचना दिल्या आणि रशीदने कट रचला, असं तपासातून समोर आलं आहे.
advertisement

भारतीय गुप्तचर संस्था सक्रिय

एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, जामीन मिळाल्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आलं आहे की, पाळत ठेवण्यात आली आहे हे स्पष्ट नाही. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आता भारतीय गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. निलेश घायवळप्रमाणे रशीद केबलवाला याने फेर पासपोर्ट तयार केला होता.

पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत

advertisement
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की , आम्ही त्याचा गुन्हेगारी इतिहास आणि कागदपत्रे योग्य माध्यमांद्वारे शेअर करू. रशीद केबलवाला दिल्ली पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत आहे. तो तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाचा जवळचा सहकारी आहे आणि त्याच्या टोळीच्या कारवाया हाताळत होता. तो कुख्यात लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटशी देखील संबंधित आहे . गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्रेटर कैलास-1 मध्ये व्यापारी नादिर शाह यांच्या हत्येप्रकरणी त्याचं नाव समोर आलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Crime : 'मोस्ट वॉन्डेट'च्या पावलावर पाऊल ठेऊन निलेश घायवळ देश सोडून पळाला? गुप्तचर संस्था अ‍ॅक्शन मोडवर!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement