लुटीचा डाव आला अंगलट, पुण्यात तीन महिला तलाठी अडकल्या जाळ्यात

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथं एकाचवेळी तीन महिला तलाठ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.

AI generated Photo
AI generated Photo
पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथं एकाचवेळी तीन महिला तलाठ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली असून, त्यापैकी शारदादेवी पाटील या तलाठी महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या तिन्ही महिला तलाठ्यांनी जमिनीचे सात-बारे आणि आठ अ उतारे देण्यासाठी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सात-बारा व आठ अ उतारे मिळवण्यासाठी त्यांनी हवेली तालुक्यातील संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला. यावेळी तिन्ही महिला तलाठ्यांनी संगनमत करून तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी आणि स्वीकारलेले पैसे

तलाठी प्रेरणा पारधी: त्यांनी २४० प्रतींसाठी तब्बल १६,४०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी चार हजार रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते.
advertisement
तलाठी दीपाली पासलकर: यांनी साडेसहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि ती रक्कम तलाठी पारधी यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले होते.
तलाठी शारदादेवी पाटील: यांनी आधी दीड हजार रुपये स्वीकारले आणि त्यानंतर अजून दोन हजार रुपयांची मागणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाचेच्या या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. 'एसीबी'ने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी तलाठी शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
advertisement
पाटील यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, लाचेच्या मागणीत सामील असलेल्या उर्वरित दोन तलाठी प्रेरणा पारधी आणि दीपाली पासलकर यांच्यावरही कारवाईची प्रक्रिया 'एसीबी'ने सुरू केली होती. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिन्ही महिला तलाठ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लुटीचा डाव आला अंगलट, पुण्यात तीन महिला तलाठी अडकल्या जाळ्यात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement