Pankaja Munde: बीडच्या वाल्मिकचा गेमओव्हर, आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख; पंकजा मुडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून वाल्मिक कराडच हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
पुणे : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून वाल्मिक कराडच हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे अवघ्घा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. बीडच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. या प्रकरणावर भाजपच्या मंत्री पंकजा मुडे यांना प्रश्न विचारला असता, 'मला अजून आरोपपत्राबद्दल माहिती नाही, जेव्हा माहिती होईल त्यावेळी मी बोलेल' अशी प्रतिक्रिया दिली.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या पुण्याच्या दौऱ्यावर होत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी जेव्हा प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विचारणा केली असता पंकजा मुंडे पत्रकारांवरच संतापल्या.
या प्रकरणाबद्दल मला माहिती नाही जेव्हा माहिती होईल त्यावेळी बोलेल. आरोपपत्रात काय लिहिलं आहे ते मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर माहिती नाही. तुमच्यावर कोड ऑफ कन्टेपट दाखल करावा लागेल. हे सगळं गृह खात्याकडे असतं त्यांना माहिती असेल. पुण्यात आहे तर पुण्यातले प्रश्न विचारा, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पत्रकारांना खडसावलं.
advertisement
तसंच, पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारामध्ये त्या मुलीवर बलात्कार झाला. नांदेडमध्ये शुक्रवारी प्रकार घडला संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत. देशमुख हत्येविषयी मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे. मुळात माझ्याकडे ग्रह खातं नाही. Cid कोर्टात माहिती देईल. आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी शब्द दिल्यावर मी बोलणे चुकीचे ठरेल. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत नक्की कारवाई होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी बातम्या/पुणे/
Pankaja Munde: बीडच्या वाल्मिकचा गेमओव्हर, आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख; पंकजा मुडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement